Saturday, October 22, 2011

Kadhi milanar tu mala - Marathi Kavita for friends

कधी  मिळणार  तू  मला  - Marathi Kavita for friends 

कधी मिळणार माझ्या जिवलगा तू मला,
तुझ्या आठवणीने तुझ्या विरहाने,
जगणे मुश्कील झाले रे वेड्या,
काय सांगू तुला, कसे समजाऊ तुला,
कधी मिळणार माझ्या जिवलगा तू मला.

जसा चातक बघतो ढगांची वाट,
आज मी हि जसा एक चातकाच,
मला आहे रे तुझ्या भेटीची आस,
कधी मिळणार माझ्या जिवलगा तू मला,

कृष्ण आणि सुदामा होते म्हणे जिवलग मित्र,
असा कसा रे का तुला नाही होत हेवा त्यांचा,
आपली मैत्री हीच श्रेष्ठ नाही का वाटत तुला,
कधी मिळणार माझ्या जिवलगा तू मला.

Read more Marathi Poems on friendship, love, mothers and fathers here at my Marathi Poem Blog

No comments:

Post a Comment